मुंबई : गरोदर महिलेने एक, दोन किंवा चार मुलांना जन्म दिल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण आता चक्क अभिनेता अक्षय कुमारने सहा मुलांना जन्म दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्का बसला ना?. पण तुम्ही समजतायं तसं काही नाहीये. कारण, अभिनेता अक्षय कुमार याने खरोखरं बाळांना जन्म दिलेला नाहीये तर त्याच्या आगामी शोच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


अभिनेता अक्षय कुमार याच्या बॅक टू बॅक रिलीज होणा-या सिनेमांमुळे शाहरूख आणि सलमान यांचे सिनेमाही कमी पडले. लवकरच हे तिन्ही स्टार येत्या महिन्यात छोट्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. मात्र, छोट्या पडद्यावर अभिनेता अक्षय कुमारच लीड करणार असल्याचं दिसत आहे.


अभिनेता अक्षय कुमार 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पूनरागमन करणार आहे. या शोसंदर्भातला एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमार गरोदर दाखविण्यात आला आहे. तसेच तो एक-दोन नाही तर सहा बाळांना जन्म देत असल्याचंही दाखविण्यात आलं आहे.



हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की, अभिनेता अक्षय कुमार हा कॉमेडीचा बादशहा आहे.