...तरच करेन लग्न; ट्विंकलनं `या` अटी मान्य केल्यानंतरच अक्षयनं बांधली लग्नगाठ
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अक्षय-ट्विंकल
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अभिनेता अक्षय कुमार ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी गोष्टी मीडियासमोर आल्या. पण आता समोर आलेली बातमी ही ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार या दोघांच्याही चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.
अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासमोर काही अटी ठेवल्या. आणि त्यानंतरच त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड कलाकार हे खूप मोकळ्या विचारांचे असतात, असं म्हटलं जातं मात्र तसं काहीच झालं नाही.
'या' अटी ठेवून अक्षयने केलं लग्न
ट्विंकल खन्नाने लग्नानंतर काम करणे बंद करावे, अशी अक्षय कुमारची इच्छा होती. मात्र, ट्विंकल खन्नाने हे मान्य केले नाही. त्यानंतर तिने 'मेला' हा सिनेमा साइन केला. मात्र हा चित्रपटही फ्लॉप झाला आणि ट्विंकलने अभिनयाला अलविदा केला.
ट्विंकल खन्नाने एका मुलाखतीत सांगितले होते की, अक्षयने तिच्या अभिनयावर आणि स्टँड-अप कॉमेडी करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे तिने अभिनयातून पूर्णपणे माघार घेतली.
तसेच अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा दोनदा साखरपुडा झाला आहे. अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांचा पहिल्यांदा साखरपुडा मोडला होता. यानंतर ट्विंकल अतिशय नाराज झाली होती.
लग्नाअगोदर बनवली होती अटीची यादी
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाचा एक लोकप्रिय किस्सा आहे. लग्नाअगोदर ट्विंक खन्नाने अक्षय कुमारच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकरता यादी तयार केली होती. अक्षयकडून सगळ्यांच्या आजारांबाबत विचारलं.
अक्षयच्या कुटुंबात कोणत्या व्यक्तीला कोणता आजार आहे. यावरून तिने आपल्याला कोणत्या आजारापासून बचाव करावा लागेल, याची तयारी केली.
ट्विंकल खन्नाने 2016 मध्ये करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मोठा खुलासा केला. ट्विंकलची आई अक्षयला गे समजत होती. या मागचं कारण अक्षय गे असल्याचं डिंपल कपाडियाच्या जर्नलिस्ट मैत्रिणीने सांगितलं होतं.