Mission Raniganj Collection Day 1 : बॉलिवूड लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. अक्षय कुमार एका वर्षात जवळपास 6-7 चित्रपट करतो. गेल्या वर्षी अक्षयनं तीन चित्रपट केले असून ते चित्रपट चांगलेच हिट झाले. यंदाच्या वर्षाची सुरुवात ही अक्षयसाठी चांगली नव्हती तर इमरान हाश्मीसोबत असलेला त्याचा 'सेल्फी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला होता. त्यानंतर त्याचा 'ओएमजी 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि हा प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडून गेला. त्यानंतर त्याला वाटलं की आता सगळं स्थिरस्थावर झालं आहे. दरम्यान, नुकताच त्याचा 'मिशन राजीनंग' प्रदर्शित झाला. अक्षयच्या आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटानं सगळ्यात कमी कमाई केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिशन राजीनंग' हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली हे जाणून घेण्याची इच्छा सगळ्यांना लागली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अक्षयचा हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जवळपास 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला घेऊन प्रेक्षक हवे तसे उत्सुक नसल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटासाठी करण्यात आलेली बूकिंग ही गेल्या काही काळापासून त्याच्या फ्लॉप ठरलेल्या सेल्फी या चित्रपटापेक्षा देखील खूप कमी होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर असाच राहिला तर कसं होईल अशी आशा आता अक्षयच्या चाहत्यांना लागली आहे. 


सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त 2.8 कोटींची कमाई केली. हा आकडा अपेक्षेपेक्षा खूप कमी आहे. जवळपास 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी इतकी कमी कमाई केल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. 


कशावर आधारीत आहे हा चित्रपट?


13 नोव्हेंबर 1989 रोजी पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीची दुर्घटना घडली होती. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील महाबीर खाणीत कोळसा खाणीच्या ब्लास्टिंग दरम्यान, पाण्याच्या टेबलाच्या भिंतीमध्ये एक भेग पडली, ज्यामुळे पाणी वेगाने वाहू लागले. परिणामी, 220 कामगारांपैकी सहा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. लिफ्टजवळ असलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. मात्र, 65 कामगार खाणीत अडकले होते.


हेही वाचा : परिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!


या घटनेच्या वेळी जसवंत सिंग गिल यांनी त्या ठिकाणी अतिरिक्त मुख्य खाण संचालक म्हणून काम केले. अडकलेल्या सर्व 65 कामगारांना वाचवण्यात त्यांनी वीरतापूर्ण भूमिका बजावली. त्याने खाणीत अनेक बोअरहोल खोदले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढेपर्यंत अन्न आणि पाणी पुरवले. त्यांच्या शौर्य आणि प्रयत्नांसाठी, जसवंत सिंग गिल यांना 1991 मध्ये भारत सरकारने 'सर्वोत्तम जीवन रक्षक पदक' प्रदान केले होते.