Akshay Kumar On Wife Twinkle Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘खेल खेल में’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटाची पटकथा ही 7 मित्रांवर आधारीत आहे. एकदिवस ते फोन संबंधीत एक खेळ खेळण्याचा विचार करतात आणि मग त्यांची काही गुपीतं ही समोर येतात. त्यानंतर त्यांचं लग्न आणि मैत्री तुटते. असं म्हटलं जातं की ‘खेल खेल में’ हा चित्रपट इटॅलियन कॉमेडी-ड्रामा 'परफेक्ट स्ट्रेंजर्स' चा रीमेक आहे. या सगळ्यात अक्षय कुमारनं खुलासा केला की त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही जेव्हा त्याचे पर्सनल मेसेज वाचते, तेव्हा तिची काय प्रतिक्रिया असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज 18 शोशाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारनं खुलासा केला की 'जर मला माझ्या पार्टनरला फोन दाखवायचा असेल तर मी मुळीच घाबरणार नाही. माझा फोन हा माझ्या स्टाफ मेंबर्सकडे असतो. घरात नेहमी इथे-तिथे पडलेला असतो, चार्ज होत राहतो. माझ्याकडे लपवण्यासारखं असं काही नाही.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अक्षय कुमारनं फोन गेमवरून एक गोष्ट सांगितली, 'ज्यावर हा चित्रपट आधारीत आहे. त्यानं सांगितलं की हा कोणत्याही आऊटडोर गेम्सपेक्षा जास्त मजेशीर असेल, कारण आऊटडोर गेम्स ती गंमत देत नाही. फोन गेममध्ये डोक लावावं लागतं. जर तुमचा पार्टनर किंवा मित्रांनी तुमचे पर्सनल मेसेज वाचले, तेव्हा विचार करावा लागतो की आता काय बोलू.'


अक्षय कुमारला विचारलं की त्याला लग्नाला घेऊन काही सुचवायचं आहे का? तर त्यानं उत्तर दिलं की 'मला कोणाला काही सुचवायचं नाही. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या अनुभवातून शिकायला हवं. पण लग्न हे आयुष्यातील एक सुंदर सर्कल आहे. माझ्या किंवा इतर कोणाचं ही ऐकण्या ऐवजी प्रत्येकानं त्याचा अनुभव घेतला पाहिजे. तेव्हाच त्याला याविषयी कळेल. माझे अनुभव कोणत्याही व्यक्तीसाठी महत्त्वाचे ठरत नाही, कारण प्रत्येकाची एक वेगळी मानसिकता आहे आणि वेगळा स्वभाव आहे. त्यामुळे हेच योग्य ठरेल की तुम्ही स्वत: च्या चुकांमधून शिका आणि तुमच्या नात्यात पुढे जा.'


हेही वाचा : शाहरुख खाननं दिला होता Devdas ला नकार, व्हायचं नव्हतं मद्यपी...; भन्साळींच्या या वक्तव्यानं दिला होकार


दरम्यान, ‘खेल खेल में’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच फरदीन खान, तापसी पन्नू, आदित्य सील, एमी विर्क आणि प्रज्ञा जायसवाल सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीजनं केलं आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे याच दिवशी श्रद्धा कपूर आमि राजकुमार रावचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय जॉन अब्राहमचा ‘वेदा’ देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.