Akshay Kumar and Raj Thackeray : रजकारणी मंडळी आणि कलाकार यांच्यातील खास कनेक्शन वारंवार लोकांच्या समोर येत असतात. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्यातील खास नातं सर्वांसमोर आलं आहे. नुकताच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) या सिनेमाची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिनेमाच्या शुभारंभ सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमाचं विशेष म्हणजे 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमात अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. सिनेमात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाच्या शुभारंभ सोहळ्यात अक्षयची एक झलक दाखवण्यात आली. 


सिनेमा शुभारंभ सोहळ्यात अक्षयने राज ठाकरेंबद्दल मत व्यक्त केलं. 'मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी.. असं ते मला म्हणाले. महाराजांची भूमिका साकारणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल.'


'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांची मेजवाणी प्रेक्षकांना एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहे. 


'वेडात मराठे वीर दौडले सात' (chhatrapati shivaji maharaj role) सिनेमात अक्षय कुमार शिवाय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.