मुंबई : बॉलीवुडचा एक्शन हिरो आणि 'खिलाडी' असलेल्या अभिनेता अक्षय कुमारने नुकताच एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. हा पोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे. हा फोटो शेयर करताना हे माझ पहिल प्रेम अस त्याने लिहिलंय. २०१६ साली मराठी सिनेमा 'कौल मनाचा' च्या ट्रेलर लॉन्चिंग दरम्यान शाळेत आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल भाष्य केलं होतं. जेव्हा तुम्ही शाळेत असता तेव्हा तुमच पहिल क्रश किंवा प्रेम दुसर कोणी नसत तर तुमची टीचर असते. अक्षयच पहिलं प्रेमही त्याची टीचर होती. अक्षय आपल्या टीचरकडे आकर्षित झाला होता. दरम्यान अक्षयची पुन्हा एकदा आपल्या टीचरसोबत मुलाखत झाली. 'मला मराठी शिकविण्याच श्रेय यांना जातं. या माझ्या शाळेतील दिवसातील मराठी शिक्षिका आहेत. यांच्याशी मुलाखत करण्याचा यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही.' अशी पोस्ट त्याने फोटो शेयर करत लिहिली. अक्षय या फोटोत खूप आनंदी दिसतोय.



त्याच्या या फोटोला एका दिवसात ९ लाखाहून अधिक लाईक्स आले असून कमेंट्सचा पाऊस पडतोय.