Bhooth Bangla Release Date Out: काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच दिवशी कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर चाहत्यांना आता हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आवडतात हे निश्चित झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता 'भूल भुलैया' नंतर अक्षय कुमार आणखी एका हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीचा दुहेरी डोस मिळणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर पोस्टरसह या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ज्यामध्ये तो कंदील हातात धरलेला दिसत आहे.


'या' दिवशी रिलीज होणार 'भूत बंगला' चित्रपट


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये अक्षयने म्हटले आहे की, 'आज आम्ही हॉरर कॉमेडी 'भूत बंगला' चित्रपटाचे शूटिंग सुरू करत आहोत, त्यामुळे माझ्या आवडत्या प्रियदर्शनसोबत सेटवर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हॉरर आणि कॉमेडी हा दुहेरी डोस 2 एप्रिल 2026 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.



14 वर्षांनंतर अक्षय- प्रियदर्शन पुन्हा एकत्र 


'भूत बंगला' या चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 2 एप्रिल 2026 ला प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात एक कंदील दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. अशातच आता अक्षय कुमारचा हा चित्रपट गेम चेंजर ठरणार का हे बघावे लागणार आहे. 


14 वर्षांपूर्वी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांचा 'खट्टा मीठा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अक्षय कुमारचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा हॉरर -कॉमेडी चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार आणि एकता कपूर करत आहेत. अक्षय कुमारचे दोन वर्षांपासून चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होताना दिसत आहेत.