मुंबई :  टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'. दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येक जण कपिलच्या विनोद बुद्धीने सर्व तणाव विसरतो. काही कारणांमुळे कपिल शर्माच्या शोला ब्रेक लागला होता. त्यानंतर शो आता पुन्हा ऑनएअर होण्याच्या मार्गावर आहे. शोच्या पहिल्या एपिसोडच्या  चित्रीकरणाला सुरूवात देखील झाली आहे.  त्यामुळे कपिलच्या चाहत्यांचा आनंत द्विगुणीत झाला आहे. सध्या शोच्या पहिल्या एपिसोडची सर्वत्र चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आता कपिल आणि अक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणीचं आसणार आहे. सांगायचं झालं तर अक्षय आता त्याच्या आगामी 'बेल बॉटम' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी व्यस्त आहे. 



चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये  हजेरी लावणार आहे. एपिसोड ऑनएअर होण्यापूर्वी कपिल शर्माने सोशल मीडियावर अक्षयसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शन देखील दिलं आहे. सध्या अक्षय आणि कपिलचा हा फोटो तुफान चर्चेत आहे.


फोटोमध्ये अक्षय कपिलचे पाय धरताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत कपिलने कॅप्शनमध्ये, 'प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आपल्या नव्या #bellbottom चित्रपटासाठी आशीर्वाद घेताना...' असं लिहिलं आहे.  सध्या कपिलची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.