Akshay Kumar Mumbai Metro : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत त्यानं मुंबई मेट्रोनं प्रवास केल्याचे पाहायला मिळत आहे. तर या सगळ्यात त्याच्या आजुबाजूला लोक आहेत पण कोणी त्याला ओळखलं नाही. अक्षयसोबत निर्माता दिनेश विजय देखील आहेत. या व्हायरल व्हिडीओत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तो अक्षय आहे हे कळलंच नाही. मात्र, त्याच्या चाहत्यांनी त्याला ओळखलं आहे. त्याच्या एका चाहत्यानं गुपचूप हा व्हिडीओ शूट केला आहे. 


अक्षय कुमारचा मुंबई मेट्रोनं प्रवास 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत अक्षयचा चेहरा दिसत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे त्यानं त्याचा चेहरा हा मास्कनं लपवला आहे. अक्षय कुमारच्या या साधेपणानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. अक्षयच्या या व्हिडीओला त्याच्या एका फॅनपेजनं शेअर केलं आहे. मुंबईच्या ट्रॅफिकपासून वाचून राहण्यासाठी अक्षयनं मुंबई मेट्रोनं प्रवास केला आणि त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 



ही पहिली वेळ नाही जेव्हा अक्षय हा मेट्रोनं प्रवास करतोय. तर 2023 मध्ये देखील त्यानं मुंबई मेट्रोनं प्रवास केला होता. मात्र, तेव्हा तो त्याच्या सेल्फी या चित्रपटाचं प्रमोशन करत होता आणि इतर प्रवासींशी बोलताना दिसला होता. 


दरम्यान, अक्षयच्या कामाविषयी बोलायचे झाले तर गेल्या वर्षी त्याचा OMG 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. याशिवाय त्याचा मिशन रानीगंज आणि सेल्फी देखील प्रदर्शित झाले होते. अक्षय इथेच थांबला नाही तर यावर्षी त्याचे 8-9 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर त्यातील काहींची घोषणा झाली आहे. तर लवकरच काहींची घोषणा करण्यात येणार आहे. त्याशिवाय 'सोरारई पोटरू' चा हिंदी रीमेक आणि 'बडे मियां छोटे मियां' सारखे चित्रपट तो करणार आहे. इतकंच नाही तर तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' मध्ये दिसणार आहे. तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.