नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कूमारच्या पॅडमॅन चित्रपटाचे पोस्टर अलीकडेच प्रदर्शित झाले. चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. तर चित्रपटाची लोक आर्वजून वाट बघत आहेत.


चित्रपटातील कलाकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात अक्षय कूमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे या अभिनेत्री मुख्य भुमिकेत आहेत. तर चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री टिव्ंकल खन्ना हीने केली आहे.


ट्रेलर लॉन्चसाठी खास शैली


चित्रपटाच्या ट्रेलरची माहिती खुद्द अक्षयने ट्वीट करून दिली आहे. यावेळी ट्रेलर लॉन्चसाठी एक खास शैलीचा वापर करण्यात आला आहे. 


काय म्हणाला अक्षय ?


या ट्वीटमध्ये अक्षयने लिहिले की, पॅडमॅनचा ट्रेलर आज ११ वाजता होईल. यासोबतच त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्या ट्वीटवर रिट्वीट केल्याने ट्रेलर लॉन्च झाल्यावर तुमच्या चॅट बॉक्समध्ये ट्रेलरची लिंक येईल. 




पाहुणे कलाकार


चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे. आर. बाल्की यांचे 'पा' आणि 'चीनीकम' हे चित्रपट काही खास होते. तसंच या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावतील.


चित्रपटाचा विषय अनोखा


चित्रपटाचा विषय अनोखा आहे. अरुणाचलम या व्यक्तीने स्वस्त दरात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स बनवून एक क्रांतिकारी बदल केला होता. त्यासाठी त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.