अमृतसर : 'गोल्ड' या आगामी चित्रपटासाठी सध्या अमृतसरमध्ये असलेल्या अक्षयकुमारने नुकतीच सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यस्त शुटिंगमधून आणि धकाधकीच्या जीवनातून थोड वेळ काढून अक्षयने सुवर्ण मंदिराला भेट दिली. या भेटीनंतर त्या परिसरात काही क्षण निवांत बसल्याचा एक फोटो अक्षयने पोस्ट केला आहे. 



 


एरवी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बॉलिवूड स्टार गेले तर त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा असतो. मात्र सुवर्ण मंदिरात  या सार्‍यापासून दूर जाण्याची संधी अक्षयला मिळाली. काही सूत्रांच्या माहितीनुसार मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी अक्षयने कोणतीही विनंती न करता, उलट चेहरा झाकून प्रवेश केला. 


सुवर्ण मंदिरातच्या बाहेर रात्रीच्या वेळेस शांत बसलेल्या अक्षयने  हा अनुभव खूपच स्वर्गीय असल्याचे त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहले आहे.  यंदाचे वर्ष अक्षयसाठी बॉक्सऑफिसवर खूपच दमदार ठरले आहे. नुकताच त्याने ५० वा वाढदिवस साजरा केला.