Akshay Kumar Birthday Malakaleshawer Temple : सुपरस्टार अक्षय कुमार याचा आज 56 वा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यानं महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. गेली तीस वर्षे अक्षय कुमार आपल्या अभिनयानं चाहत्यांना वेड लावतो आहे. एकावर एका सिनेमे त्याचे गेली अनेक वर्षे प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रगंलेली असते. यावर्षीही त्याचे डझनभर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे त्याची विशेष चर्चा आहे. आपल्या नेटकऱ्यांना तो सतत खुश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अभिनयाचे सर्वच जण चाहते आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमारकडे कॅनेडियन सिटीझनशिप होती. अगदी काही दिवसांपुर्वी त्याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती. त्याला त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छाही मिळाल्या होत्या. सोबत सोशल मीडियावर त्यानं आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्रंही शेअर केले होते, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अक्षय कुमार भारताचे नागरिकत्व कधी घेणार याच्याही तूफान चर्चा रंगल्या होत्या. 


हेही वाचा : शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल


सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षय कुमारच्या या भेटीची. यावेळी समोर आलेल्या फोटोतून दिसते आहे की तो भक्तीत तल्लीन झालेला आहे. काही दिवसांपुर्वी त्याचा OMG2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगलाच यशस्वी झाला. परंतु 11 ऑगस्ट त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या Gadar 2 या चित्रपटानं पुर्णपणे बॉक्स ऑफिस हे गाजवले आहे. हा चित्रपट 500 कोटींच्या पुढे गेला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या OMG2 लाही या चित्रपटानं मागे टाकले आहे. महाकालेश्वरच्या जोर्तिलिंग देऊळात अक्षय कुमारनं हजेरी लावली होती. यावेळी त्यानं आरती आणि पुजा केली. त्याच्या सोबत त्याची बहीण, त्याच्या बहीणीची मुलगी, मुलगा आरव कुमार आणि क्रिकेटर शिखर धवनही उपस्थित होते. उज्जैन येथे हे महाकालेश्वरचे मंदिर आहे. महाकाल देवासाठी आरती त्यानं केली. 



या मंदिरातनंतर त्यानं महाकाल लोकला भेट दिली. आज सकाळी त्यानं पूजा व आरती केल्याचे कळते आहे. त्यानंतर ते इंदौर एअरपोर्टला पोहचले. सध्या देशाचे नावं, इंडियावरून भारत ठेवण्याकडे कल आहे. त्यातून यावरून राजकारणही पेटले आहे. याच पार्श्वभुमीवर अक्षय कुमारनं आपल्या आगामी चित्रपटाचेही नावं बदलले आहे. Mission Ranigan: The Great Indian Rescue वरून हे नावं Mission Ranigan: The Great Bharat Rescue असं करण्यात आलं आहे.