मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आसामची राहणारी महिला धावपटू 18 वर्षीय हिमा दासवर बायोपिक बनवणार आहे. हिमाने काही दिवसांपूर्वीच आयएएएफच्या अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला होता. हिमाने आयएएएफ टूर्नामेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. असं करणारी ती महिला धावपटू बनली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय सध्या त्याच्या नवीन सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'गोल्ड' हा सिनेमा खेळावर आधारीत आहे. शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो पोहोचला होता. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या आशियाई स्पर्धत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना त्याने शुभेच्छा दिल्या.



अक्षयने म्हटलं की, 'मी हिमा दासवर बायोपिक बनवू इच्छितो. कारण ती एक ट्रॅक रनर आहे. तिने जे यश मिळवलं आहे ते खूप कमी लोकांना मिळतं. एखादा खेळाडू भारताच्या एखाद्या अशा दुर्मिळ भागातून येणं आणि सुवर्ण पदक जिंकणं अविश्वसनीय वाटतं.'