मुंबई : सर्व भारतीयांची मान गर्वाने उंच करणाऱ्या 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्याची तयारी आणि त्यामागील खरी गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीय वैज्ञानिक राकेश धवन यांचे व्यक्तीमत्व साकारण्याची जबाबदारी अक्षय कुमारला देण्यात आली आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक झलक चाहत्यांना टीझरच्या माध्यमातून अनुभवता येत आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल करण्यात करण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ती यांनी केले आहे.  



खुद्द अक्षय कुमारने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये,'मी हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी साकारला आहे. मला आशा आहे की 'मिशन मंगल' चित्रपट जेवढा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, तेवढाच त्यांना प्रेरित सुद्धा करेल.' असे त्याने लिहिले आहे.