नवी दिल्ली : रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहीण-भावासाठी खास असतो. मग अगदी सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी हा दिवस सगळ्यांनाच खास वाटतो. अभिनेता अक्षय कुमारची बहीण अल्का यांचा एक स्पेशल व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आपल्या भावाच्या म्हणजेच खिलाडी अक्षय कुमारबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. अल्का म्हणाल्या की, त्या अक्षय कुमारकडून खूप गोष्टी शिकल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांची अक्षयचे आभार देखील मानले आहेत. स्वतःच बहिणीकडून झालेलं कौतुक ऐकून अक्षय भावूक झाला आणि त्याने शेवटी येऊन बहिणीला प्रेमपूर्वक मिठी मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


व्हिडीओ :