नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार सध्या केपटाऊनमध्ये परिवारासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. याचदरम्यान त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोत तो एका कुत्र्यासोबत दिसत आहे. आणि कोवळया उन्हात त्याच्या खांद्यावरचा टॅटू उठून दिसत आहे. टॅटूत त्याने आपल्या पत्नीचे निक नेम म्हणजे टिना असे गोंदवले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘या गुड बॉयबरोबर साउथ आफ्रिकेत कोवळ्या उन्हाचा आनंद घेताना.’



पॅडमॅन चित्रपटाबद्दल...


अक्षयचा पॅडमॅन हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात अक्षयसोबत सोमन कपूर, राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुट्टीवरून परताच तो चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होईल. हा चित्रपट आर. बाल्की दिग्दर्शित हा चित्रपट अरूणाचलम मुरूगानाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची प्रोड्युसर म्हणून ट्विंकल खन्नाने जबाबदारी स्वीकारली आहे.