मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडचे असे अनेक चित्रपट आहेत, जे फक्त आणि फक्त अक्षयच्या अभिनयामुळे आणि टीमच्या मेहनतीमुळे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. मायानगरीत अक्षयने स्वतःचे सर्व स्वप्न पूर्ण करून दाखवले. आता अक्षयचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. अक्षयने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. त्याचं नवीन घर अतिशय भव्य असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय कुमार आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. अक्षय कुमारनेही असे दिवस पाहिले जेव्हा तो मुंबईत दुसऱ्याच्या बंगल्याच्या बाहेर उभं राहून फोटोशूट करायचा.



आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या बंगल्यात अक्षयला फोटो क्लिक करण्यासाठी कधीही एन्ट्री मिळाली नाही. पुढे तो त्याच बंगल्याचा मालक झाला. आता अक्षय फक्त एक नाही तर दोन घरांचा मालक आहे. 
 
चित्रपटांमधून बक्कळ कमाई करणाऱ्या अक्षय कुमारने मुंबईत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारच्या नवीन घराची किंमत ७.८ कोटी रूपयांचा आहे. 


अक्षयचा फ्लॅट खार पश्चिम येथील जॉय लिजेंड बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर आहे, जिथे त्याला त्याची पार्किंगसाठी भरपूर जागाही देण्यात आली आहे. अक्षय जगभरातील करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. 


म्हणूनच अक्षयच्या नवीन फ्लॅटबद्दल जाणून घेतल्यासाठी, त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. परंतू याबद्दल त्याने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.