Al Pacino Pay Every Month 25 Lakh to 54 year younger ex girlfriend : ऑस्कर विजेता अभिनेता अल पचीनोची त्यांच्याहून 54 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहमुळे चर्चेत आहेत. नूर अल्फल्लाहनं काही दिवसांपूर्वी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव रोमन असून आता तो 4 महिन्यांचा झाला आहे. दरम्यान, त्यासाठी आता अल पचीनो हा तिला दरमहिन्याला खर्च म्हणून 30,000 डॉलर म्हणजेच जवळपास 25 लाख रुपये देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईटी ऑनलाइननं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर मध्ये 29 वर्षांच्या अल्फल्लाहनं तिच्या मुलाचा ताबा मिळावा म्हणून तिनं अप्लाय केलं आहे. ऑक्टोबरमध्ये त्यांनी बाळाच्या ताबावरून एक तोडगा काढला आहे. 83 वर्षांचा अल पचीनो हा त्याची गर्लफ्रेंड नूरला सगळ्यात आधी 110,000 डॉलर द्यायचं आहेत. त्यानंतर दरमहिन्याला 30,000 डॉलर मुलाच्या खर्चासाठी देणार आहे. तर वर्षाच्या शेवटपर्यंत  नूरला 90,000 डॉलर द्यायचे आहेत. 


पचीनो यावर्षाच्या सुरुवातीला रोमनच्या शिक्षणासाठी दरवर्षी 15,000 डॉलर देखील देणार आहे. इतकंच नाही तर, हेल्थ इंशोरन्समध्ये जे आरोग्यासंबंधीत जे सगळे खर्च आहेत. त्यासाठी 100 टक्के खर्च हा पचीनो करणार आहे. सुरुवातीला अल्फल्लाहला मुलाचा ताबा देण्यात येणार आहे. तर पचीनोला मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातून एक गोष्ट समोर आली आहे की पचीनो त्याची गर्लफ्रेंड नूरच्या वकिलांची 20 हजार डॉलर फी देखील देणार आहेत. पचीनो आणि नूर यांची भेट ही एप्रिल 2022 मध्ये झाली होती. तर 6 जूनला लॉस एंजलिसच्या सीडर्स-सिनाई रुग्णालयात रोमनचा जन्म झाला होता. 


नूर अलफल्लाह एक चित्रपट निर्माता असल्याचं बोललं जात आहे. रोलिंग स्टोन्सचा गायक मिक जेगर याच्याशीही याआधी तिचं नाव जोडलं गेलं होतं. तसंच 2019 मध्ये ए-लिस्टर हॉलिवूड स्टार क्लिंट ईस्टवुड (93) सोबत देखील ती दिसली होती. परंतु ते फक्त कौटुंबिक मित्र असल्याचं सांगण्यात आलं होतं. 


हेही वाचा : फराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून


अल पचीनो हा त्याच्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रशंसित अभिनेत्यांपैकी एक आहे. द गॉडफादर, स्कारफेस, हीट, द डेव्हिल्स अॅडव्होकेट, इन्सोम्निया, द आयरिशमॅन आणि सेन्ट ऑफ अ वुमन यांसारख्या क्लासिक चित्रपटातील आल्या अभिनयासाठी ते प्रसिद्ध आहेत. 1992 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्काने त्यांना गौरवण्यात आलं होतं.