मुंबई : सलमान खानच्या 'भारत' सिनेमातून प्रियांकाची एक्झिट झाल्यानंतर त्याच्या जागी कॅटरिना कैफचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. कॅटरिना कैफचं व्यस्त शेड्युल पाहता काही महिन्यांनी ती भारत सिनेमा सुरू करणार आहे. 


अलीने ट्विट केले फोटो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अली 'भारत' सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. त्याने या चित्रपटाचे काही फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खानचा चेहरा दिसत नाही. मात्र रशियन सर्कसचा बॅकड्रॉप  असलेल्या एका ठिकाणी सलमान खान बाईकवर बसलेला दिसत आहे. यामध्ये सलमान स्टंट करण्याची शक्यता आहे. 



 



सलमान खानचा फोटो शेअर करताना अलीने 'ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे ' ट्विट केले आहे. सलमान खानसोबत दिशा पटनीने सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. 


कोरियन चित्रपटाचा रिमेक 


'भारत' हा कोरियन सिनेमा ‘ऑड टू माई फादर’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. तर दिशा पटनी आणि नोरा फतेही  देखील झळकणार आहे. 
भारत हा सिनेमा 5 जून 2019 म्हणजेच पुढल्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात 1947 से 2010 चा काळ चित्रपटात दाखवला जाणार असून सलमान खान यामध्ये वय वर्ष 25 ते 65 मध्ये दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबददल विशेष आकर्षण आहे.