लग्न करत आता एकमेकांची कायमस्वरुपी साथ देणार बॉलिवूडची `ही` जोडी
अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते.
मुंबई : बॉलीवूडची स्पष्ट अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अली फजलला डेट करत आहे. दोघांची पहिली भेट 'फुक्रे' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
लग्नाच्याबेडीत अडकण्यासाठी जोडपं सज्ज
आता सगळे चाहते अली आणि रिचाला वधू-वराच्या जोड्यामध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोघांच्या लग्नाबाबत रोज काही नवे अपडेट्स समोर येत असतात. 2020 मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकणार होतं, पण कोरोना महामारीमुळे लग्न पुढे ढकलावं लागलं. आता बातमी येत आहे की, अली आणि रिचा मार्च महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
मार्च महिन्यात लग्न करणार अली आणि ऋचा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अली आणि रिचाचं लग्न मुंबई आणि दिल्ली या दोन शहरात होणार आहे. या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे लोक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे 'फुक्रे 3'च्या शूटिंगदरम्यान दोघंही लग्नगाठ बांधणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग दिल्लीत होणार आहे. लग्नासाठी हे जोडपे मुंबईला जाणार आहेत. रिचा आणि अलीच्या लग्नाच्या तारखेबद्दल अनेक अटकळ बांधल्या जात आहेत.
ऋचा आणि अली 2015 पासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडीने 'फुक्रे' आणि 'फुक्रे रिटर्न्स' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली आणि 2017 मध्ये दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं होतं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अली फजल आणखी एका हॉलिवूड चित्रपटाचा भाग बनणार आहे. 'डेथ ऑन द नाईल' हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे.