मुंबई : अभिनेता आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता (Ranbir Kapoor) सध्या  'ब्रह्मास्त्र'  सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शनापुर्वी महाकालाच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीही होता. महाकालच्या दर्शनासाठी आलेल्या 'ब्रह्मास्त्र'च्या टीमला तेथे विरोधाला सामोरं जावं लागलं. यावेळी आंदोलक काळे झेंडे घेऊन महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आणि त्यांचा विरोध केला. स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाकाल मंदिराबाहेरील बिघडलेल्या वातावरणामुळे अयान मुखर्जी ( ayan Mukherji) महाकालच्या दर्शनासाठी आणि संध्याकाळच्या आरतीसाठी एकटाच पोहोचला. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यात फक्त अयान मुखर्जी संध्या आरतीमध्ये सहभागी होताना दिसत आहे.



दरम्यान, बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक सिनेमांनी प्रदर्शनापूर्वी बॉयकॉटचा सामना केला आहे. आता 'ब्रह्मास्त्र' बॉयकॉटच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 


त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहाता ब्रह्मास्त्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) किती कोटींपर्यंत मजल मारतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमात आलिया आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.