Alia Bhatt And Ranbir Kapoor New Year 2023 Celebration : बॉलिवूडची लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांची जोडी. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 ते दोघं लग्न बंधनात अडकले. याशिवाय त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देखील दिली. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. यानिमित्तानं सगळेच आतुर होते. प्रत्येकानं काहीतरी वेगळं करत नवीन वर्षाचे  स्वागत केले. दरम्यान, आलिया आणि रणबीरनं नवीन वर्षाचे खास स्वागत केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत. आलियानं सगळ्यात आधी तिचा पजामात फोटो शेअर केला आहे. आलियानं सिल्क नाईट सूट परिधान केला आहे. आलिया आणि रणबीरनं त्यांच्या घराच्या गॅलरीत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. याच गॅलरीत आलिया आणि रणबीर लग्न बंधनात अडकले होते. (Alia Bhatt Instagram Photo Viral) 



आलिया आणि रणबीरच्या या पार्टीत शाहीन भट्ट, अभिनेता आदित्य रॉय कपूर, निर्माता रोहित धवन, त्याची पत्नी जाह्नवी धवननं हजेरी लावली होती. त्या सगळ्यांनी परिधान  केलेले कपडे पाहता ही पजामा पार्टी असल्याचे कळत आहे. हे फोटो शेअर करत आलियानं 'नवीन वर्षांच्या खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात आनंदानं आणि पजामात... जवळच्या लोकांसोबत आणि चायनिझ जेवणासोबत करत आहे. चला चला नवीन वर्षासाठी खूप उत्साही आहे,' असे कॅप्शन दिले आहे. (Alia Bhatt And Ranbir Kapoor New Year 2023 Celebration At There House) 


हेही वाचा : 'या' आघाडीच्या Actress वर काय आली ही वेळ....एकेकाळी 400 जाहिरातीत कलेय काम


आज आलिया तिच्या करिअरच्या त्या टप्प्यावर आहे, जिथे पोहोचणं जवळपास प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. लहान वयातच तिला स्टारडम मिळालं आणि तिनं ते टिकवूनही ठेवलं. नुकताच तिचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटात आलियासोबत तिचा पती रणबीर कपूरची देखील मुख्य भूमिका आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), मौनी रॉय (Mouni Roy) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या आलियानं कामातून ब्रेक घेतला असून तिच्या मुलीसोबत वेळ व्यथित करत आहे. याशिवाय  रणबीर लवकरच रामायणावर आधारीत एक चित्रपट करणार असल्याचे म्हटले जातं आहे.