मुंबई : बॉलिवूड अभिनेता आलिया भट्ट आपल्या करिअरमध्ये भरपूर प्रगती करत आहे. आताच तिचा 'राझी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने वर्ल्डवाइड 200 करोड रुपयांहून अधिक कमाई केली आहे. मात्र आताची बातमी ही आलियाच्या खाजगी आयुष्याशी जोडलेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आलियाचं अभिनेता रणबीर कपूरसोबत अफेअर असल्याचं म्हटलं आहे. आता ही दोघंजण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


कधी करणार लग्न? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, आलिया आता आपल्या करिअरच्या उच्च स्थानावर आहे. अवघ्या 25 व्या वर्षी एवढं यश खूप कमी अभिनेत्रींना मिळालं आहे. आलिया - रणबीर यांच एकमेकांवर प्रेम असून ते एकमेकांशी लग्न करू इच्छितात. मात्र यांच लग्न हे 2020 च्या अगोदर होणार नाही. आलिया - रणबीर या दोघांकडे आता खूप चांगले प्रोजेक्ट आहेत. यामुळे आता त्यांना खाजगी आयुष्याचा करिअरवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. आता हे दोघे लवकरच आपलं काम पूर्ण करून लग्नाचा विचार करणार आहेत. 


रणबीर - आलिया लवकरच 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. यासोबतच आलिया गुल्ली बॉय, कलंक आणि शुद्धी या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीर कपूरचा आगामी आणि बहुप्रतिक्षित 'संजू' हा सिनेमा 29 जून रोजी रिलीज होत आहे. तसेच ब्रम्हास्त्र, शमशेर आणि लव रंजन नेक्स्टमध्ये दिसणार आहे.