मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट ‘गली ब्वॉय’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं शूटिंग दोन दिवसांपूर्वीच सुरु झालंय. या सिनेमात रणवीर एका स्ट्रीट रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे.


आलिया-रणवीर पहिल्यांदाच एकत्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि आलिया या दोन्ही लोकप्रिय कलाकारांचा हा एकत्र पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्येही या सिनेमाची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या सिनेमच्या सेटवरून या दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचेही लूक सिंपल दिसत आहेत. 


या सिनेमात रणवीर आणि आलिया यांच्यासोबतच कल्कि कोचलिन सुद्धा दिसणार आहे. 



‘गली ब्वॉय’ या सिनेमाचं दिग्दर्शन फरहान अख्तर याची बहिणी झोया अख्तर ही करणार आहे. 



या सिनेमाची निर्मिती फरहान अख्तर, रितेश सिधवानी, एक्सल एन्टरटेन्मेट आणि झोया द्वारा लॉन्च करण्यात आलेल्या ‘टायगर बेबी’ या बॅनरखाली करण्यात येणार आहे. आलिया आणि रणवीरने या सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती.