मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच पालक होणार आहेत. आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत बेबी बम्पची प्रशंसा करताना दिसत आहे. तर तिने तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. पण प्रेग्नेंसी असूनही आलिया तिच्या आणि रणबीर कपूरच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सतत व्यस्त असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, हे स्टार्स नुकतेच हैद्राबादला पोहोचले. जिथे आलियाने फक्त तिचा मोठा बेबी बंप दाखवला नाही तर तिने तिच्या सूटच्या मागच्या बाजूला कॅप्शनमध्ये असं काहितरी लिहीलंय जे लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.


गुलाबी सूट घातला
या खास प्रसंगी आलिया भट्टने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.   हा सूट खूपच सैल आहे. ज्यामध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप लपवताना दिसली. एवढंच नाही तर आलियाने पोट झाकण्यासाठी पुढच्या बाजूला दुपट्टा घेतला आहे. ज्याने ती तिचा बेबी बंप कव्हर करताना दिसली.


यावेळी आलिया भट्ट जो सूट परिधान करताना दिसली तो अनेक अर्थांनी खास आहे. शरारावर इंग्रजीमध्ये 'लव्ह' लिहिलेलं दिसलं, तर सूटच्या मागील बाजूस असं कॅप्शन लिहिलं होतं की आलियाने मागे वळून पाहताच हे कॅप्शन लोक वाचू लागले. आलियाच्या सूटच्या मागे लिहिलं आहे 'बेबी ऑन बोर्ड'.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आलियाची काळजी घेताना दिसत आहे. जे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.आलियाने तिचा हात धरला होता.