मुंबई : आजकाल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहेत. परंतु त्याहीपेक्षा हे जोडपं त्यांच्या होणाऱ्या मुलाबद्दल चर्चेत आहे. आलिया भट्टने जूनमध्ये गरोदरपणाची घोषणा केली, तेव्हापासून ती सतत चर्चेत आहे. त्याचबरोबर तिचे सर्व चाहते आलियाच्या बेबी शॉवरची वाट पाहत होते. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतच आलिया भट्टच्या बेबी शॉवरचं आयोजन करण्यात आलं होतं. जे तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी खास बनवलं होतं. यावेळी नीतू कपूर, महेश भट्ट, करिश्मा कपूर, करण जोहर, आकांक्षा रंजन, शम्मी कपूरची पत्नी नीला देवी, रिद्धिमा कपूर, अयान मुखर्जी आणि रोहित धवन असे अनेक स्टार्स उपस्थित होते.


आलिया भट्टच्या बेबी शॉवरच्या या कार्यक्रमातून अनेक फोटो समोर आले आहेत.  ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. आलिया भट्टची मैत्रिण आणि अभिनेत्री आकांक्षा रंजनने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आलिया तिच्या गर्ल गँगसोबत दिसत आहे. आलियाने पिवळ्या रंगाचा साधा ड्रेस घातला असून या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर, आलिया खूप आनंदीही दिसत आहे. ज्याची झलक तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते.



रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत रिद्धिमा रणबीरसोबत दिसत आहे आणि तिने कॅप्शन दिलं आहे की, "बाबा होण्यासाठी." दुसरीकडे, दुस-या फोटोत आलिया रिद्धिमासोबत आहे आणि तो शेअर करत तिने लिहिलं की, "आई होण्यासाठी." यासोबतच रिद्धिमाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आलियासह संपूर्ण गर्ल गॅंग दिसत आहे.