मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. आलियाने अलीकडेच संजयसोबत तिचे काही फोटो शेअर करुन या चित्रपटाच्या रॅपअपची घोषणा केली. आता या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आलियाने तिच्या नवीन प्रोजेक्टची तयारी सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया पुढच्या चित्रपटाच्या तयारीत 
आलिया भट्टचा पुढचा चित्रपट 'डार्लिंग्स' सुपरस्टार शाहरुख खानच्या होम प्रॉडक्शनमध्ये तयार होत आहे. या चित्रपटाचे फोटो त्याने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. इंस्टा स्टोरीवर हे फोटो शेअर करताना आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माय टुडे डेट'. तिच्या या घोषणेनंतर चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.


काय असेल डार्लिंग्जची कथा?
चित्रपटाविषयी बोलताना हा चित्रपट एका आई आणि मुलीवर आधारित आहे. ज्यांचं आयुष्य अनेक चढउतारांवरुन जात असतं. आई-मुलीची ही जोडी जगात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करते अशी या चित्रपटाची कथा असेल. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाविषयी बोलताना चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.


अशाप्रकारे पूर्ण झालं चित्रपटाचं शूटिंग 
गंगूबाई काठियावाडीच्या ट्रेलरची आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे. चित्रपटाच्या रॅपअपचे फोटो शेअर करत आलिया भट्टने लिहिलं की, 'आम्ही 8 डिसेंबर 2019 रोजी गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग सुरू केलं होते... आम्ही 2 वर्ष चित्रपटाचं शूटिंग करत होतो. हा चित्रपट आणि त्याचा सेट दोन लॉकडाऊन, 2 सायक्लॉन त्याचबरोबर निर्मात्यांसह अभिनेत्यांना शूटिंगदरम्यान कोविडलाही सामोर जावं लागलं आहे.