मुंबई : फोटोशूटचं वेड कलाजगतासोबतच सर्वसामान्यांमध्येही पाहायला मिळतं. पण, सेलिब्रिटींच्या फोटोशूटची बातच न्यारी. विविध चित्रपट असो, ब्रँड असो किंवा आणखी काही. नवनवीन संकल्पनांचा आधार घेत ही सेलिब्रिटी मंडळी असं काही अफलातून फोटोशूट करतात, की पाहणाऱ्यांची नजर हटता हटत नाही. यामधीलच एक ट्रेंड म्हणजे, बोल्ड फोटोशूट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट (Alia Bhatt) साठी 2022 हे वर्ष  वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगलं आहे; आलियाच्या आयुष्या राहा नावाची गोंडस परी आली. तर दुसरीकडे तिचे सगळे चित्रपट सुपरहिट ठरले. 


नकतीच आलिया  झी सिने अवॉर्ड्स (Zee Cine Award)मध्ये पोहचली होती. जिथे तिच्यापेक्षा तिने परिधान केलेल्या गाऊनची जोरदार चर्चा झाली. याचबरोबर यावेळी तिने गर्भधारणेच्या प्रसूतीनंतर पहिल्यांदाच डान्स पफॉर्मन्स सादर केला. आलियाने अवॉर्ड फंक्शनवेळी परिधान केलेल्या गाऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात आलियाने हिरव्या रंगाच्या गाऊनची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 
 
आलिया भट्टने अवॉर्ड  फंक्शनमध्ये परिधान केलेल्या गाऊनची किंमत ऐकून भुवया उंचावतील
फोटोत दिसणाऱ्या गाऊनमध्ये आपण पाहू शकतो की, हा एक हाई स्लिट रिवीलिंग गाऊन आहे. ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. तुम्हाला आम्ही तुमच्या माहितीसाठी सागंतो की, आलियाचा हा ए लाईन जॉर्जेट गाऊन खूप डिपनेक आहे. उंच स्लिट आणि साईड कट-आऊट्ससोबत डिझाईन केला आहे. आलियाने आपल्या लूकला सुंदर बनवण्यासाठी एक सुंदर नेकलेस आणि तिची एंगेजमेंट रिंगने कम्लिट केलं. 



गाऊनची किंमत ऐकून भुवया उंचावतील
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टचा हा नवीन गाऊन फॅशन ब्रँड 'Costarellos' च्या 'रिसॉर्ट 2023 कलेक्शन'चा आहे. हा गाऊन ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवरून सुमारे 2 हजार युरोमध्ये घेता येईल. भारतीय चलनात, आलिया भट्टने परिधान केलेल्या या गाऊनची किंमत 1,71,740 रुपये आहे.
 
आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे, या अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने प्रसूतीनंतर पहिल्यांदाच स्टेजवर डान्स परफॉर्मन्सही दिला, ज्याच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.