गरोदरपणात काम करणारी आलिया अडचणीत; आता तिला रडूच येईल...
आलियाचा मुलाखतीतला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सध्या 'डार्लिंग्स' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी आलिया सतत कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते. यावेळी कार्यक्रमात आलियाला कधी तिच्या लग्नाविषयी, तर कधी रणबीर विषयी प्रश्न विचारले जातात. यावर आलिया उघडपणे तिची बाजू मांडताना दिसते. अलीकडेच 'डार्लिंग' चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित झालं. यावेळी आलियाला प्रेग्नेंसीमध्ये काम करण्याविषयी तिचं मत विचारलं.
नुकताच इन्स्टंट बॉलिवूडनं आलियाचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत आलियाला प्रेग्नेंसीमध्ये काम करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तू प्रेग्नेंसीमध्ये काम करतेस आणि आराम करत नाहीस? असा प्रश्न आलियाला विचारला. तर यावर उत्तर देत आलिया म्हणाली, 'काही त्रास होत नाही, मी आणि नेहा बॅकस्टेजवर बोलत होतो की जर तुम्ही फीट, निरोगी असाल, तर विश्रांती घेण्याची गरज नाही..काम केल्याने मला आनंद होतो... हा माझा छंद आहे... यामुळे मी उत्साही राहते, म्हणून मी 100 वर्षांची होईपर्यंत काम करेन.
आलियाचे हे उत्तर नेटकऱ्यांना आवडले नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केले. एका नेटकऱ्यानं तिच्या प्रेग्नेंसीची खिल्ली उडवली आणि कमेंट करत म्हणाला, असं वाटतं की आलिया ही जगातली पहिली प्रेग्नेंट महिला आहे, जी आई होणार आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, 'काम करणं ही चांगली गोष्ट आहे पण 100 वर्ष, दीदी गुडघे घासतील'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'Omg मला गरोदरपणात काम करावं लागलं, बिचारीला किती जड माईक दिला आहे. दरम्यान, 'डार्लिंग्स' हा आलिया भट्टचा प्रोडक्शनचा पहिला चित्रपट आहे.
आलिया भट्टला ट्रोलिंचा फरक पडत नाही
आलिया भट्ट एका मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर उघडपणे बोलली आहे. ट्रोलिंगवर आपलं मत मांडताना आलिया भट्ट म्हणाली, 'मला आता ट्रोलिंगची फारशी पर्वा नाही. किती लोकं ट्रोल करतात? मला वाटतं की आपण ट्रोलर्सला खूप महत्त्व देतो. अशा प्रकारे आलिया भट्टने स्पष्ट केलं आहे की ती ट्रोलला गांभीर्याने घेत नाही.
आलिया भट्टने सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर केलं वक्तव्य
चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर किती परिणाम होतो किंवा नाही, असा प्रश्न आलिया भट्टला विचारण्यात आला आहे. यावर आलिया भट्टने उत्तर दिलं की, 'चित्रपटांच्या कामगिरीचा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे परिणाम होतो. आम्ही चित्रपटासाठी खूप मेहनत करतो आणि वाटतं की चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा वाईटही वाटतं.