मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आलिया आई झाली असून मातृत्वाचा आनंद घेत आहे. आलियानं  नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. आलिया आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) मुलीचे नाव राहा आहे. राहाच्या जन्मानंतर ते दोघेही तिच्यासोबत जितका मिळेल तितका वेळ व्यथित करताना दिसत आहेत. सध्या राहाच्या जन्मानंतरच्या काळाचा आनंद आलिया घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टचे ताजे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळेच आलियाला वाईटरित्या ट्रोल केलं जात आहे कारण नेटिझन्सना असं वाटत आहे की अभिनेत्रीने बोटॉक्स सर्जरी केली आहे.


खरंतर, व्हायरल होणारे हे फोटो  प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळचे होते. जिथे आलिया या बर्थडे पार्टीत सहभागी झाली होती. संजय लीला भन्साळी यांच्या या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र यादरम्यान आलिया भट्टच्या लूकने सर्वांचीच लाइमलाइट चोरली होती.


आलिया भट्टचं खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. याच कारणामुळे आलियाची कार पार्टीजवळ येताना दिसताच पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याची स्पर्धा सुरू केली. सोशल मीडियावर आलियाचे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात ती तिच्या कारमध्ये बसलेली दिसत आहे.


आलियाचे ताजे फोटो पाहताच तिला युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली. आलियाचे फोटो पाहून, सोशल मीडिया युजर्स अंदाज लावत आहेत की, अभिनेत्रीने बोटॉक्स सर्जरी केली आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या बोटॉक्स सर्जरीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.


आलियाच्या फोटोंवर कमेंट करत एक यूजर म्हणला की, अभिनेत्री वेगळी दिसत आहे, कदाचित तिने बोटॉक्स सर्जरी केली असेल. तर अजून एका युजर्सने अभिनेत्रीने तिचा लूक बदलण्यासाठी केलेल्या सर्व सर्जरीचे डिटेल्स शेअर केले. तर अजून एका युजर्सने  सांगितलं की आलियाने कदाचित तिच्या नाकाची चमक काढून टाकली असावी, तर काही नेटिझन्स म्हणत आहेत की ती खूप गुबगुबीत दिसत आहे.



दरम्यान, कामाविषयी बोलायचं झालं तर, आलिया भट्ट करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणवीर सिंग दिसणार आहे. तर याशिवाय आलिया 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार असून यात तिच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. याशिवाय लवकरच आलियाचा हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' प्रदर्शित होणार आहे. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे.