मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरचं पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आलिया लवकरचं आई होणार आहे. खुद्द आलियाने सोनोग्राफी दरम्यानचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'लवकरचं आमचं बाळ येणार आहे...' असं लिहिलं आहे. दरम्यान आलियाने आनंदाची बातमी दिल्यानंतर रणबीर देखील बाबा होण्याची तयारी करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रणबीर आगामी सिनेमा 'शमशेरा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता सिनेमाच्या प्रमोशनसाठी नुकताचं ‘रविवार विद स्टार परिवार’ शोमध्ये पोहोचला. यावेळी अनुपमा (Anupamaa) फेम अभिनेत्री  रूपाली गांगुली ( Rupali Ganguly) ने रणबीरला उत्तम पालक होण्यासाठी काही टिप्स देखील दिल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रूपाली, रणबीरला लहान बाळाला कसं सांभाळल पाहिजे हे सांगताना दिसत आहे. रणबीर देखील रुपाली सांगेल तसं प्रामाणिक पणे करताना दिसत आहे. पाहा व्हिडीओ...


व्हिडीओमध्ये, रणबीर कपूर रुपालीला विचारताना “मला जगातील सर्वोत्तम पिता व्हायचे आहे, त्यामुळे तुम्ही मला मदत करा मी काय करू शकतो? यावर रुपालीने उत्तर दिले की, 'आपका बच्चा आपके दिल की तरह है, जो आपके सीने से बाहर धडकता है' सध्या रणबीरचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.