आलिया भट्ट ADHD या गंभीर आजारानं त्रस्त; स्वत: केला खुलासा; काय आहेत याची लक्षणं?
Alia Bhatt is Suffering From Adhd : आलिया भट्ट आहे या गंभीर आजारानं त्रस्त, स्वत: खुलासा करत म्हणाली...
Alia Bhatt is Suffering From Adhd : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या जिगरा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी पासून सतत प्रमोशनसाठी मुलाखती देताना दिसते. दरम्यान, अशाच एका मुलाखतीत आलियानं तिला असलेल्या एका गंभीर आजाराविषयी सांगितलं आहे. आलियानं सांगितलं की तिला ADHD आहे. आता हा कोणता आजार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा अर्थ अटेंशन डिफीसिएट हायपरअॅक्टिव्ह डिसऑर्डर आहे.
आलियानं 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं सायकोलॉजिकल टेस्ट केली त्यावेळी तिचा अनुभव काय होता याचा खुलासा केला आहे. याविषयी सांगत ती म्हणाली की 'लहाण असताना शाळेत आणि क्लासरुममध्ये ती किंवा कोणाशी बोलताना झोन आउट व्हायची. मी आता काही दिवसांपूर्वी तिनं एक सायकोलॉजिकल टेस्ट केली, ज्यात एक गोष्ट समोर आली की माझ्यात ADHD ची लक्षण दिसून येत आहेत. मला ADHD आहे.'
आलिया भट्टनं पुढे मुलाखतीत सांगितलं की 'जेव्हा तिनं तिच्या मित्र-मैत्रिणींना याविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना हे आधीपासून माहित होतं की असं काही आहे. तिच्या मित्र-मैत्रिणींना याविषयी माहित असलं तरी देखील आलियाला याविषयी काही माहित नव्हतं. जेव्हा तिनं टेस्ट केली त्यानंतर तिला हे कळालं. त्यामुळे तिला हे समजून घेण्यासाठी मदत झाली की याच कारणामुळे तिला कॅमेऱ्यासमोर खूप चांगलं आणि शांत वाटतं.'
आलियानं पुढे सांगितलं की जेव्हा ती कॅमेऱ्यासमोर असते, तिला तेव्हा प्रेझेंटेबल असल्याचं वाटतं आणि त्यासोबत तिला भूमिका साकारण्यास मदत होते. तिला तिच्या मुलीसोबतचा अर्थात राहासोबत घालवलेला वेळ देखील अशीच शांततात देतो. तर तिच्या आयुष्यात असलेल्या या दोनचं गोष्टी आहेत एक कॅमेरा आणि दुसरी राहा जे तिला शांतता देतात.
काय आहे ADHD आजार?
ADHD हा एक न्यूरोडेव्हलपमेंट संबंधीत आजार आहे. हा आजार लहाणपणी होतो आणि आपण मोठे झालो तरी राहतो. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या रोजच्या कामावर आणि आयुष्यावर परिणाम होतो. अशा व्यक्तीला कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यास अडचणी निर्माण होतात. याच आजारामुळे आलियानं तिच्या लग्नात मेकअप आर्टिस्टला 2 तास तयार होण्यास नकार दिला होता. तिनं 45 मिनिटात मेकअप करण्यास सांगितलं कारण आलिया त्याहून जास्त वेळ मेकअप चेअरवर बसू शकत नाही. त्यामुळे ती खूप कमी मेकअप करते.