मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' रिलीज होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, ती अनेकदा ती मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट होताना दिसते. नुकतीच आलिया भट्ट वर्सोवामध्ये दिसली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाच्या चाहत्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की, आलिया वर्सोवाला ऑटो रिक्षाने आली. होय, आलिया भट्ट आपली महागडी कार  सोडून ऑटो रिक्षाने वर्सोवाला गेली. यावेळीचे तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.



वास्तविक, आलिया काही कामानिमित्त बाहेर निघाली होती आणि तिने वर्सोवा ईथून जेटीची राईड घेतली. यादरम्यान, आलिया भट्ट व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिममध्ये दिसली. याशिवाय आलियाने पीच कलरचा मास्क घातला होता. या साध्या लूकमध्ये आलिया खूप सिंपल आणि छान दिसत होती.



त्याचवेळी, आलियाच्या चित्रपटांबद्दल बोलताना, गंगूबाई काठियावाडी व्यतिरिक्त, आलिया एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट RRR मध्ये दिसणार आहे. आलिया या चित्रपटातून तेलगूत पदार्पण करत आहे.