मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट त्या सुंदर अभिनेत्रींमधील एक आहे जिने अगदी कमी वेळात खूप चांगल नाव कमावलं. तिच्या अभिनयासोबतच तिने आपली फॅशनेबल स्टाइल देखील खूप बदलली आहे. कायम क्यूट ड्रेसेसमध्ये दिसणारी आलिया नुकतीच पारंपरिक वेशभूषेत दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचा हा लूक अतिशय सिंपल आणि साधा आहे. ती साध्या लूकसोबत परफेक्ट एक्सेसरीज स्टाइल केली आहे. सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असणारी आलिया या लूकमुळे खूप चर्चेत आहे. 







आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून आपल्या आई सोनी राजदानसोबत कोलकातामध्ये  कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दिसल्या. तेव्हा तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये आलियाचा खूप स्टनिंग लूक दिसत आहे.