मुंबई : बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. अनेक प्रसिद्ध बॉलिवूडकरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे झगमगत्या दुनियेत भीतीचं वातावरण आहे. अभिनेत्री आलिया भट्टला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आलियाने सोमवारी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत स्वतःच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. फोटोमध्ये आलिया बेडवर झोपलेली दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये 'एक दिवस, पुन्हा एकदा..' असं लिहिलं आहे. फोटोमध्ये आलियाची प्रकृती कोरोनामुळे फारशी चांगली नाही. पण तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत आहे. फोटोमध्ये आलिया पूर्णपणे आराम करत असल्याचं दिसून येत आहे. आलियाने 2 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याची बतमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 



कोरोनाच्या जाळ्यात आडकल्यानंतर तिने स्वतःला राहत्या घरी आयसोलेट करून घेतलं आहे. आलियाच्या आधी अभिनेता रणबीर कपूरला देखील कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. त्याच्यानंतर लगेच आलियाला कोरोना विषाणूची लागण झाली. आलियासोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. 


बॉलिवूडमध्ये देखील कोरोना व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. अनेक प्रसिद्ध कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. रणबीर कपूर, अक्षय कुमार पाठोपाठ गोविंदा देखील कोरोनाच्या जाळ्यात सापडला आहे. अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'राम सेतू' सिनेमातील तब्बल 45 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.