आलियावर लागली हजार कोटी रूपयांची बोली... का वाढला एवढा भाव?
फार कमी कालावधीत आलियाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. दिग्दर्शक करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. फार कमी कालावधीत तिने यश संपादन केलं आहे. आज अनेक दिग्दर्शकांनी आलियावर हजारो कोटी रूपये लावले आहेत. तिच्याकडे यंदाच्या वर्षी जवळपास 6 पेक्षा अधिक चित्रपट आहेत. सोबतचं आलिया 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटात आलिया अभिनेता रणवीर कपूरसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास 83 कोटी आहे.
आलिया आता तिच्या आगामी चित्रपटांच्या कामांमध्ये व्यस्त आहे. काही चित्रपटांचं चित्रीकरण सुरू आहे. तर काही चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. आलियाच्या आगामी चित्रपटांचं बजेट देखील तगडं आहे. दिग्दर्शक करण जोहरने 'तख्त' चित्रपटाची घोषणा केली. यामध्ये अनेक मोठ्या कलाकारांची मेजवानी प्रेक्षकांना एकाचं स्क्रिनवर अनुभवता येणार आहे.
'तख्त' चित्रपटाचा बजेट 250 कोटी रूपयांच्या आसपास आहे. शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट खाली तयार होत असलेल्या 'डार्लिंग्स' चित्रपटात देखील आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'डार्लिंग्स' चित्रपटाचा बजेट जवळपास 150 कोटी आहे.
आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बी- टाऊनमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी कपल्सच्या यादीत या जोडीचा समावेश होतो. अशी ही बहुचर्चित जोडी येत्या काळात ब्रह्मास्त्र या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 150 ते 200 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
आरआरआर चित्रपटात देखील आलिया झळकणार आहे. 'आरआरआर' या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटी एवढं आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चुलबुली गर्ल आलिया भट ही रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर सिंघम अजय देवगण या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.
आलियाचा बहुप्रक्षीत चित्रपट 'गंगुबाई काठियावाडी' सध्या तुफान चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताचं प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. या चित्रपटाचा बजेट 80 कोटी रूपये आहे.