COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby First Photo : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं आहे. त्यानंतर भट्ट आणि कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. 6 नोव्हेंबरला आलियाला कन्यारत्न झाल्यावर सोशल मीडियावर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. आलिया-रणबीरच्या चाहत्यांमध्ये आता कपूर कुटुंबाच्या परीची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुकता आहे. अगदी नीतू सिंग हॉस्पिटलमधून घरी परत असताना पापाराझींनी त्यांना विचारलं की बाळ कोणासारखं दिसतं ते? 


आलियाची सोनपरी


आलिया-रणबीरची सोनपरी कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या फोटो मध्ये आलिया लहान बाळाला प्रेम करताना दिसतं आहे. (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby First Photo Viral on social media nmp)



त्याचबरोबर काही फॅन पेजवर आलिया आणि रणबीरचे कॉम्प्युटराइज्ड फोटोही दिसत आहेत.  आलिया भट्टचे लहानपणीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.