मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा सिनेमा राजी लवकरच रिलीज होणार आहे. आलियाने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला होता. त्यानंतर आता या सिनेमाचे पहिले गाणे रिलीज ऐ वतन रिलीज झालेय. या गाण्यातून सिनेमाची संपूर्ण कथा आपल्यासमोर येते. या सिनेमाची कथा १९७१ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजीचे हे गाणे अर्जित सिंहने गायलेय. गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिलेत. गाण्याच्या बॅकग्राऊंडला शंकर महादेवन यांचाही आवाज तुम्हाला ऐकू येईल. या गाण्याला शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिलेय. सिनेमाची कथा खऱ्या घटनेवर आधारित आहे. सिनेमात आलियाची जी भूमिका आहे ती काश्मीरमध्ये राहणाऱी आणि देशासाठी हेरगिरी करणाऱ्या मुलीची आहे. आलियाचे लग्न पाकिस्तानात करुन देण्यात येते. 



या सिनेमात आलियाशिवाय विक्की कौशलचीही प्रमुख भूमिका आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी सिनेमातही तिच्या आईची भूमिका साकारलीये. सिनेमाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनची आहे. हा सिनेमा ११ मेला रिलीज होणार आहे.