मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आलियानं लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आज आलिया ही तिच्या करिअरच्या शिखरावर असली तरी तुम्हाला माहितीये का तिनं 'स्टुडंट ऑफ द इयर'मध्ये काम करण्यासाठी किती मानधन घेतले होते, याचा खुलासा आलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 


आणखी वाचा : आलिया भट्ट की कपूर? कपूर घराण्याचं आडनाव लावण्याबाबत अभिनेत्री म्हणते...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टुडंट ऑफ द इयर' हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला होता. यावेळी आलिया भट्ट फक्त 19 वर्षांची होती. 'मिड डे'शी बोलताना आलियानं या चित्रपटासाठी 15 लाख रुपये मानधन म्हणून घेतल्याचा खुलासा केला. होय, आलियाला चित्रपटात काम करण्यासाठी 15 लाख रुपये मिळाले. अभिनेत्रीने हे पैसे घेतले आणि तिची आई सोनी राजदान यांना दिले.


आणखी वाचा : सिनेमे फ्लॉप होण्यामागे माझ्याशिवाय...; अक्षय कुमारचा खळबळजनक खुलासा



आलियानं तिची आई सोनी राझदानला चेक देण्याविषयी सांगितले, 'मी चेक थेट माझ्या आईला दिला आणि म्हणाले, 'आई, तू पैशांची काळजी घे. आजपर्यंत माझी आई माझे पैसे सांभाळते. आलिया आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. जून 2022 मध्ये आलियाने तिच्या प्रेग्नंसीबद्दल सांगितले.


आणखी वाचा : 'सेक्रेड गेम्स' पेक्षाही 'या' दाक्षिणात्य वेब सीरिजचा थरार, इंटिमेट सीनही...


जेव्हा आलिया भट्टला विचारण्यात आले की ती तिचे आडनाव भट्ट बदलून कपूर करणार का? यावर आलिया म्हणाली की तिचं स्क्रीन नाव नेहमीच आलिया भट्ट असेल, लवकरच ती अधिकृतपणे तिचं नाव बदलून आलिया भट्ट-कपूर ठेवणार आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या भूमिका आहेत