मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. आलिया याकाळात सोशल मीडियावर सक्रिय असून काहीना काही शेअर करताना दिसते. आलियानं रणबीरचा (Ranbir Kapoor) एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रणबीर 'ब्रह्मास्त्र: भाग 1 शिवा'चे (Brahmastra) प्रमोशन करण्यास नकार देत अनेक तर्कवितर्क लावतो, पण अयानचा फोन आल्यावर तो मागे फिरतो. या व्हिडिओचा शेवट खूपच मजेशीर आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट डिस्ने + होस्टारवर 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यासंबंधीत एक प्रमोशनल व्हिडिओ आलियानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे जो खूपच मजेशीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या व्हिडिओमध्ये रणबीर प्रमोशनच्या विरोधात फोनवर बोलत होता. 'नाही भाऊ, झालं... ब्रह्मास्त्रचं प्रमोशन झालंय आणि अयान मुखर्जीनं पुरेसं केलं आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ब्रह्मास्त्र येतोय, मग प्रमोशन, प्रमोशन आणि प्रमोशनचा अर्थ काय... इतकं आलिया चित्रपटात शिवा शिवा बोलली नसेल, नाचून मी स्वतः भूत बनलोय, प्रत्येक कार्यक्रमात केसरीया गाऊन आलियाचा आवाज बसलाय. 150 ड्रोन उडवले, 250 लाडू वाटले, आता काय करायचं, सगळ्यांच्या घरी जायचं का? वैयक्तिकरित्या, मी सर्वांना सांगू इच्छितो की देवी, सज्जनांनो, आमचा चित्रपट ब्रह्मास्त्र डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत आहे, कृपया पहा, कृपया पहा, प्रकाश येत आहे, प्रकाश येत आहे. प्रकाश आला, दिवाळीच्या शुभेच्छा. ब्रह्मास्त्र हिट आहे आणि अयानला काय वाटतं की ब्रह्मास्त्राच्या जाहिरातीशिवाय माझ्यासाठी जीवन नाही. मी बाप होणार आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे रणबीरला आणखी एक फोन येतो. यावेळी रणबीरशी अयान मुखर्जी बोलत असतो. 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी रणबीरला हा फोन आलेला असतो. अयानचं ऐकल्यानंतर रणबीर लगेच तयार होतो आणि म्हणतो की त्याने या चित्रपटाचे प्रमोशन केले पाहिजे, सर्वांनी ब्रह्मास्त्र पहायला पाहिजेय. अयानचा फोन डिस्कनेक्ट केल्यावर रणबीर कुशन डोक्यात मारताना दिसत आहे. (Alia Bhatt Shared A Video Of Ranbir Kapoor Refusing To Promote Brahmastra Which Coming On Ott Know The Reason Why) 


आलियाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील मित्रही कमेंट करत आहेत. रणवीर सिंग, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, भाग्यश्री, डायना पेंटी, रिद्धिमा पंडित, सोनी राझदान, सोफी चौधरी, झोया अख्तर यांसारख्या सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर हसणारे इमोजी शेअर केले आणि खूप मजेदार म्हटले.