अचानक रणबीरचं नाव ऐकताच लाजली आलिया, असं आवरला स्वतःचा आनंद
सिनेमा कुणाचाही असो आलिया - रणबीर कायमच चर्चेत
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा मौसम आहे. नुकताच कतरिना-विकीने लग्न करून चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला आहे. असं असताना आता बॉलिवूडच्या दुसऱ्या लोकप्रिय जोडीकडे चाहत्यांच लक्ष वेधलं आहे.
आलिया भट्ट स्टारर चित्रपट RRR चा ट्रेलर आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी लाँच झाला आहे. यावेळी चित्रपटातील संपूर्ण कलाकार एकत्र दिसले. आलियाने सर्व अभिनेत्यांमध्ये सर्व लाइमलाइट लुटले. लाल साडीत आलिया अप्रतिम दिसत होती आणि जेव्हा तिला रणबीरशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती आणखी सुंदर दिसू लागली.
'आर' सोबत खास कनेक्शन
ट्रेलर लाँच कार्यक्रमात आलिया भट्टने लाल साडी नेसली होती. आलिया एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित पीरियड ड्रामा आरआरआरमध्ये काम करत आहे. या चित्रपटात आलिया राम चरण, जूनियर एनटीआर, अजय देवगण यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर संपूर्ण टीमने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकाराने आलियाला 'आर' शब्दाबद्दल विचारले.
आलिया भट्टची प्रतिक्रिया
R हा शब्द तुमच्या आयुष्यात लकी आहे का? असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर उपस्थित लोक हसू लागले. त्याचवेळी आलिया भटने लाजली आणि म्हणाली की, या प्रश्नाने मला धक्का बसला आहे. माझ्याकडे उत्तर नाही. मग ती स्वतःशी बोलते आणि 'मी हुशार होण्याचा प्रयत्न करत आहे' असे म्हणते.
थोड्या वेळानंतर, आलिया 'G' उच्चारते आणि नंतर म्हणते 'R एक सुंदर अक्षर आहे आणि तो देखील खास आहे'.
RRR सिनेमाची गोष्ट
आरआरआरचा ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, चित्रपटाची कथा ब्रिटिश राजवटीवर आधारित आहे. ज्यामध्ये अनेक जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन भारतीय क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित आहे. ज्युनियर एनटीआर कोमाराम भीमची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर राम चरण अल्लुरी सीतारामच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांची रागीट शैली पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही ऍक्शन प्रेमी असाल तर हा सिनेमा बघायला खूप मजा येईल. 'नाचो-नाचो' आणि 'जननी' या चित्रपटातील दोन गाण्यांचा सोशल मीडियावर आधीच बोलबाला आहे.