Alia Bhatt Spotted at Kareena Kapoor's House: अभिनेत्री आलिया भट्ट ही आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईल्ससाठी कायमच ओळखली जाते. त्यातून हल्ली ती वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरही झळकताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी तिचा मेट गाला मधला लुक कोण व्हायरल झाला होता. त्यामुळे चर्चांना तर चांगलेच उधाण आले होते. त्यानंतर ही साऊथ कोरियाला संपन्न झालेल्या गुचीच्या शोलाही हजर होती. तेव्हा तिच्या ट्रान्सपरंट बॅगची तूफान चर्चा झाली होती. तिच्या या ट्रान्सपरंट बॅगेमुळे ती ट्रोलही झाली होती. परंतु आपल्या या ट्रोलिंगवर खुद्द आलियानंच स्पष्टीकरण दिले होते. तिनंही ही गोष्ट गमतीच घेतली होती. परंतु आलियाच्या फॅशनची जेवढी चर्चा रंगते तेवढी चर्चा ही तिच्या लेकीचीही रंगताना दिसते. आलियानं अद्यापही आपल्या लेकीचा फोटो चाहत्यांना दाखवलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिच्या चाहत्यांना कधी पासून तिच्या लेकीची झलक पाहायची आहे. आलियाची लेक राहा ही म्हणता म्हणता 6 महिन्यांची झाली आहे. त्यामुळे राहाची बरीच चर्चा रंगलेली दिसते. आपल्या लेकीचे लपलेले फोटो ती सोशल मीडियावरही शेअर करताना दिसते. परंतु तिचा चेहरा कधी दाखवत नाही. मध्यंतरी तिचे आणि राहाचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते त्यामुळे आलिया याबद्दलची आपली जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आलिया आपल्या लेकीसह दोन-तीन वेळी स्पॉट झाली आहे. रणबीरही मध्यंतरी आपल्या लेकीसह स्पॉट झाला होता.


हेही वाचा >>>>> PHOTOS: लाडकी नातं आजी नीता यांच्या कुशीत! हॉस्पिटलमधून घरी जाताना श्लोका-आकाशची लेक स्पॉट...


परंतु आलिया आपल्या लेकीचा चेहरा पापराझींना दिसणार नाही ना याची सर्वोतोपरी काळजी घेताना दिसते. यावेळीही आलिया भट्ट स्पॉट झाली होती. जेव्हा आपल्या लेकीचा चेहरा पापराझींपासून वाचवण्याचा ती पुरेपूर प्रयत्न केला होता. करीना कपूरच्या घरी आलिया भट्ट आणि राहा कपूर एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे यावेळी पापराझीही राहाची झलक पाहण्यासाठी आतुर होते. त्यांनी तिची झलक घेतलीही परंतु आपल्या लेकीचे पापराझींपासून रक्षण करण्याचे आलियानं पुरेपूर प्रयत्न केले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी आलियाचे खूपच कौतुक केले आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अनेकांनी आलियाचे कौतुक केले आहे. आलियाच्या प्रायव्हसीचा आदर करा, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काहींना सरळ प्रश्न विचारला आहे की हे सेलिब्रेटी लोकं आपल्या लेकीचा फोटो दाखवण्यासाठी एवढा कंजूषपणा का करतात तर अनेकांनी राहाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.