कपूर घराण्याची होणारी सून आहे `या` देशाची नागरिक
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आलियाच्या काकांनी त्यांच्या लग्नाची अंतिम तारीख जाहीर केली आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, कपूर घराण्याची सून आलियाकडे भारतीय नागरिकत्व नाही.
आलिया भट्ट ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचा जन्मही मुंबईत झाला आहे. राझी सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री आलियाकडे कागदावर भारताचं नागरिकत्व नाही. वास्तविक, आलिया भट्टकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यामुळे आलिया भारतात मतदानही करू शकत नाही.
आलिया भट्टने स्वतःच्या नागरिकत्वाबद्दल एकदा सांगितलं होतं की, 'दुर्दैवाने माझ्याकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याने मी मतदान करू शकत नाही. पुढच्या वेळी दोन्ही नागरिकत्व मिळाल्यावर निवडणुकीत मतदान करण्याचा प्रयत्न करेन. भारतात दुहेरी नागरिकत्व प्रणाली नाही.
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट 14 एप्रिलला रणबीर कपूरसोबत सात फेरे घेणार आहे. १२ एप्रिलपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. त्यानंतर आलिया भट्ट कपूर कुटुंबाची सून होणार आहे.