मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट ही आघाडीच्या नव्या आणि दमदार कलाकारांपैकी एक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच आलिया तिचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण सुट्टी न घेता परदेशात चित्रपटाचे शूटिंग करताना आलिया वाढदिवस साजरा करणार आहे.  


आलियाचं बर्थ डे सेलिब्रेशन  


अभिनेत्री आलिया भट्ट 15 मार्चला 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सध्या आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग बुल्गारियामध्ये सुरू आहे.


फिल्मसेटवर होणार सेलिब्रेशन  



एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, आलिया तिचा सहकलाकार रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आलियाच्या बर्थडे ला महेश भट्ट, सोनी राजदान आणि तिची बहीण बुल्गारियाला पोहचणार आहे. 


करण जोहर सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणार नाही.  


करण जोहरची आई हीरु यांचा 75 वा वाढदिवस 18 मार्चला असल्याने करण जोहरचाही बुल्गारियाचा प्लॅन रद्द होणार आहे.