Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेग्नंसीनंतर आलिया 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आलिया लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार आहे. सध्या आलिया लेक राहासोबत वेळ व्यथित करताना दिसत आहे. तर त्यातून देखील आलिया तिची सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टला देखील वेळ देण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, आलिया काल तिच्या आईसोबत वेळ व्यथित करताना तिला स्पॉट करण्यात आलं. या सगळ्यात आलियानं असं काही केलं की सगळीकडे आलियाची स्तुती करण्यात येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत आलिया भट्ट तिच्या आईसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसते. त्याचवेळी आलियाचं लक्ष खाली एका ठिकाणी असलेल्या चप्पलेवर गेलं. अशात आलियानं ही चप्पल तुमच्यातली कोणाची आहे का? तर कोणाची आहे? असं विचारलं. त्यानंतर आलियानं त्या फोटोग्राफरची चप्पल उचलली आणि त्याच्या पायापर्यंत आणून दिली. यावेळी तो फोटोग्राफर तिला राहु द्या मॅम असं सतत बोलत होता. आलियानं एका फोटोग्राफरची चप्पल हातानं उचलल्यानं सोशल मीडियावर तिची स्तुती करण्यात येत आहे. तिच्या या कृत्यानं नेटकरी आनंदी झाले. 


हेही वाचा : हॉलिवूडमध्ये रात्रीच्या अंधारात पडली कलाकारांच्या संपाची ठिणगी; आता वणवा भडकणार.... नेमक्या मागण्या काय?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, "चांगली गोष्ट आहे. पण हे तिचा कोणाता आगामी चित्रपट हीट होण्यासाठी असलेला स्टंट नसावा. कशाचाही गर्व नसलेली व्यक्ती..." दुसरा नेटकरी म्हणाला, "लोक काहीही नसताना तिला ट्रोल करतात." तिसरा नेटकरी म्हणाला, "किती चांगली आहे ती." आणखी एक नेटकरी म्हणाला, "ती नेहमीच इतरांशी चांगल वागते. पण लोक उगाच तिला काही कारण नसताना ट्रोल करतात. तर काही नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल केलं आहे." एक नेटकरी म्हणाला, "हे केल्यानं तिला लोकांकडून सहानुभूती मिळेल की इतकी मोठी अभिनेत्री असून चप्पल कशी काय उचलली... थोडी लाइमलाईट मिळवण्यासाठी काही नाही तर हे लोकांना वेड्यात काढत आहेत." दुसरा नेटकरी म्हणाला, "इतकी पण अॅक्टिंग करू नका की फेक वाटू लागेल. मिडल क्लास लोक देखील अशा प्रकारे इतरांची चप्पल हातानेच उचलतात.