Alia Bhatt Video : `हनीमूनला कोण कपडे घालतं?` आलिया भट्टचा व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते. नुकतंच आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केलं. जे खूप चर्चेत होतं. कामाच्या कमिटमेंटमुळे आलिया आणि रणबीर हनीमूनला जाऊ शकले नाहीत. त्याचबरोबर आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री हनीमूनशी संबंधित प्रश्नावर मावशीवर रागावताना दिसत आहे.
हनिमूनच्या प्रश्नावर आलिया भडकली
खरंतर, हा क्लिप चित्रपटातली आहे की, जाहिरातीची आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. समोर आलेल्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती महिला आलियाला तिच्या हनीमूनला कोणते कपडे घालणार आहेस, असा प्रश्न विचारते. यावर आलिया मजेशीर पद्धतीने उत्तर देत म्हणते की, "मॉसी! हनीमूनला कोण कपडे घालतं."
रणबीर-आलियाचं हनीमून
आलिया भट्टची ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि तिचं हे उत्तर ऐकून कोणाचही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते आलियाला तिच्या आणि रणबीर कपूरच्या खऱ्या आयुष्यातील हनीमूनबद्दल प्रश्न विचारत आहेत आणि हे नवविवाहित जोडपं हनिमूनला कधी जाणार हे विचारत आहेत.