आलिया भट्टने लग्नात घातली चक्क कोल्हापुरी चप्पल...आणि ती सुद्धा जुनीच
तुम्हाला हे माहितीये का आलियाने स्वतःच्या लग्नात घातली चक्क कोल्हापुरी चप्पल आणि ती सुद्धा जुनीच...
मुंबईः लग्न म्हटलं की पोरींची 6 महिने आधी खरेदी सुरू होती..खरं आहे की नाही? फक्त खरेदीच नाही तर खरेदीचा सपाटाच सुरू होतो...मात्र हे तुम्हाला हे माहितीये का आलियाने स्वतःच्या लग्नात चप्पल सुद्धा जुनीच वापरली
रणबीर-आलियाचा 15 एप्रिलला शाही विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दोघांचाही सिंपल आणि सोबर लूक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. कोणताही डार्क मेअप नाही की कोणतीही हटके हेअर स्टाईल नाही, साधी साडी आणि मोकळे केस सोडलेल्या सिंपल लूकमध्येही आलिया सुंदरच दिसत होती.
दोघांच्या लग्नाला 5 दिवस उलटले असले तरी त्यांच्या लग्नाच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत. आणि आता तर हे समजलं आहे की आलियाने स्वतःच्या लग्नात म्हणे नवी चप्पलही खरेदी केली नव्हती
आलियाने स्वतःच्या लग्नात जुनी कोल्हापुरी ब्लॉक हिल चप्पल वापरली, जी तिने यापूर्वीही अनेक ठिकाणी वापरली होती.जुनी असली तरी आलियाच्या या ब्लॉक हिल चप्पलची किंमत आहे फक्त 4 हजार रुपये