फक्त जाहिरातींमधून आलिया भट्टला मिळणारं उत्पन्न ऐकून डोळे विस्फारतील
एका अहवालानुसार, अक्षयला मागे टाकत विराट कोहली देशातील टॉपचा ब्रँड बनला आहे. परंतू महिला सेलिब्रेटींमध्ये आलिया भट्ट सर्वात महागडी जाहिरातदार ठरली आहे.
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची सोशल मीडियावर सर्वात जास्त खिल्ली उडवली जाते आणि मीम्स बनवले जातात. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आलिया भट्ट महिलांमध्ये सर्वात टॉपची सेलिब्रिटी ब्रँड आहे. रणवीर, आलिया आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे सेलिब्रिटीदेखील 2021 मध्ये आघाडीचे ब्रँड ठरले आहेत.
विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम
क्रिकेटपटू विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतरही सर्वात टॉपचा सेलिब्रिटी ब्रँड म्हणून त्याचे स्थान कायम ठेवले आहे. डफ अँड फेल्प्स फर्मने मंगळवारी जारी केलेल्या अहवालात कोहलीचे ब्रँड मूल्य 2020 मध्ये $237.7 दशलक्षवरून 2021 मध्ये $185.7 दशलक्ष इतके घसरले. असल्याची माहिती दिली आहे.
अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा सेलिब्रेटी
विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेता रणवीर सिंग असून ज्याची ब्रँड व्हॅल्यू $158.3 दशलक्ष एवढी आहे. रणवीरने या काळात अक्षय कुमारला मागे टाकले आहे. जो आता $ 1369 दशलक्ष ब्रँड मूल्यासह तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट 681 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह चौथ्या क्रमांकावर आहे. यासोबतच महिला सेलिब्रिटींमध्ये ती आघाडीवर आहे.
दीपिका पदुकोणची कमाई आलियापेक्षा कमी आहे. दीपिका पदुकोण 51.6 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड मूल्यासह यादीत सातव्या स्थानावर आहे.