आलिया भट्ट पाळणार कपूर कुटुंबाची प्रथा? बाळाच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीला रामराम?
आलिया लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया एकीकडे तिच्या प्रेग्सेंसीचा आनंद घेत आहे तर दुसरीकडे तिचे बॅक टू बॅक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याशिवाय आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नावाचा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सगळ्यात अशी बातमी समोर येत आहे की, बाळाच्या जन्मानंतर आलिया करिअरमधून मोठा ब्रेक घेणार आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे आलिया देखील कपूर कुटुंबाची प्रथा पाळणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण कपूर कुटुंबातील सुना या बाळाला जन्म दिल्यानंतर बराच मोठा ब्रेक घेतात.
हेही वाचा : Akshay Kumar कडे 260 कोटींचं प्रायव्हेट जेट? अभिनेत्याचा मोठा खुलासा
चार वर्षांच्या डेटिंगनंतर रणबीर आणि आलिया यांनी 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. यावेळी तिचं कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते. आलियाने जूनमध्ये तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना तिच्या तिच्या प्रेग्नंसीविषयी माहिती दिली होती की ती आई होणार आहे. आलिया बाळाला जन्म दिल्यानंतर लवकरच कामावर परतण्याच्या मूडमध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे. ती एक मोठा ब्रेक घेणार आहे. 'बॉलिवूड लाइफ'नं दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्टला कामावर परत येण्याची घाई नाही कारण ती अति-सुरक्षित जागेत आहे.
सूत्रानुसार, सध्या तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे, विशेषत: मुलाला जन्म दिल्यानंतर. आलिया भट्टची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे आणि म्हणूनच तिने मुलाला जन्म दिल्यानंतर दीर्घकाळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. किमान वर्षभर ती काम करणार नाही. आलिया 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर परतणार आहे. (alia bhatt will take a long break from acting career after giving birth to baby)
हेही वाचा : 'मेरा कॅरेक्टर ढीला था, मैं लड़कियों के साथ...' ; गौहर खानसोबत साखपुडा मोडण्यावर साजिद खानचं वक्तव्य चर्चेत
‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार आलिया 2023 मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित तिच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत आलिया कामापासून दूर राहणार आहे. तिच्या सुट्टीचा हा काळ जवळपास वर्षभराचा असेल. याआधी रणबीरनेही बाळासाठी तो ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तो त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे.