Akshay Kumar कडे 260 कोटींचं प्रायव्हेट जेट? अभिनेत्याचा मोठा खुलासा

पाहा काय म्हणाला अक्षय कुमार...

Updated: Oct 17, 2022, 12:42 PM IST
Akshay Kumar कडे 260 कोटींचं प्रायव्हेट जेट? अभिनेत्याचा मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा लोकप्रिय अभिनेता आहे. अक्षय हा वर्षात कमीत कमी 5-6 चित्रपट करतो. अक्षयच्या आलिशान घरापासून ते गॅरेजपर्यंत अनेक भव्य गाड्यादेखील आहेत. रिपोर्टनुसार असा दावा करण्यात आला आहे की अक्षय कुमारकडे एक प्रायव्हेट जेट देखील आहे. आता अक्षयनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा : 'मेरा कॅरेक्टर ढीला था, मैं लड़कियों के साथ...' ; गौहर खानसोबत साखपुडा मोडण्यावर साजिद खानचं वक्तव्य चर्चेत

अलीकडे, एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की अक्षयकडे खाजगी जेट आहे आणि पोर्टलने असेही म्हटले की त्याची किंमत 260 कोटी रुपये आहे. हे वाचल्यानंतर अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली. अक्षय ही पोस्ट शेअर करत म्हणाला, 'लायर लायर पैंट ऑन फायर! लहानपणी हे ऐकलं आहे का?'  पण खरोखर काही लोक अजून मोठे झालेले नाहीत आणि मी त्यांना असचं बोलत राहू देण्याच्या मनस्थितीत नाही. माझ्याबद्दल काही निराधार लिहिलं तर मी नक्की उत्तर देईन.' अक्षय कुमारच्या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की त्याच्याकडे 260 कोटी रुपयांचे खासगी विमान नाही.

akshay kumar owns private jet worth 260 crores know what he said

दरम्यान, अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अक्षयला 'बॉलिवुडचा खिलाडी' म्हटले जाते. मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षणामुळे तो अनेक चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरोच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्याचे लग्न ट्विंकल खन्नासोबत झाले आहे. ट्विंकल खन्ना ही दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. अक्षय आणि ट्विंकल यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून आरव आणि नितारा अशी त्यांची नावं आहेत. (akshay kumar owns private jet worth 260 crores know what he said) 

अक्षय आणि ट्विंकलच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगायचे तर, ते मुंबईत 'फिल्मफेअर' मॅगझिनच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. जिथे अक्षयनं ट्विंकलवर क्रश असल्याचं व्यक्त केलं. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने हे कबूल केलं आणि म्हणाला, 'फिल्मफेअरसाठी जयेश सेठसोबतच्या फोटो सेशल दरम्यान मी ट्विंकलला पहिल्यांदा भेटलो. तो फोटो माझ्याकडे अजूनही आहे. धन्यवाद, फिल्मफेअर!'